text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पॅन कार्ड कसे काढायचे

PAN Card 

पॅन कार्ड (PAN Card) चे पूर्ण नाव (PERMANENT ACCOUNT NUMBER)  असा आहे. हा एक unique ओळखपत्र आहे.

 

 

 पॅन कार्ड कसे काढायचे
आज आपण पॅनकार्ड कसे काढायचे हे पाहणार आहोत. आपण घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉप वरून पॅनकार्ड काढू शकतो .
तसेच या प्रक्रियेद्वारे आपण पॅनकार्ड साठी अर्ज केल्यावर आपले पॅनकार्ड आपल्या घरी पोस्टाने आणून दिले जाईल. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. पॅन कार्ड हे दोन पद्धतीने काढता येत त्या पैकी एक म्हणजे  ऑनलाईन पद्धती आणि दुसरी ऑफलाइन पद्धती . 



 ऑनलाईन पॅनकार्ड काढण्याची पद्धत :-


या पद्धतीमध्ये आधार वरती जो फोटो आहे तोच पॅन कार्ड वरती येईल तुम्हाला जर दुसरा फोटो पाहिजे असेल तर ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

ऑनलाईन पॅनकार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे

I. आधार कार्ड
II. आधार कार्डला चालु मोबाइल नंबर लिंक पाहिजे
III.ऑनलाईन पैसे भरण्यासाठी क्रेडिट / डेबिट कार्ड किंवा UPI अकॉउंट

अधिकृत वेब साईट :- क्लिक करा


त्यानंतर apply online वरती क्लिक करा. त्यानंतर application type मध्ये form 49A निवडा आणि Category मध्ये individual निवडा.

त्यानंतर Title मध्ये Shri,Smt किंवा Kumari निवडा आणि त्याखाली आडनाव, नाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव भरा आणि त्याखाली तुमचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर भरा. त्यानंतर खाली दिलेल्या लहान चौकोनात क्लिक करा व submit वर क्लिक करा.



त्यानंतर continue with pan application वर क्लिक करा आणि पुढे उघडलेल्या पेज वर Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless) वर क्लिक करा.

पहिल्या पानावर आपल्या सगळ्या Personal Details व्यवस्थित वाचून भरा.
 

दुसऱ्या पानावर contact & other डिटेल्स भरा म्हणजे या पानावर तुमचा पत्ता आणि मोबाइल नंबर भरा.

तिसऱ्या पानावर AO details भरा म्हणजे या पानावर तुम्हला तुमच्या जिल्ह्याचे कर ऑफिस निवडायचे आहे.

चौथ्या पानावर तुमचे आधार चे डिटेल्स भरा आणि त्यांनतर सगळे डिटेल्स बरोबर आहेत का चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पैसे भरावे लागतील.

त्यानंतर तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाइल वर OTP येईल तो OTP वेबसाईट वर टाका आणि submit करा आता तुमचा ऑनलाईन अर्ज पुर्ण झाला.

10 ते 12 दिवसात तुमचे पॅन कार्ड पोस्टाने तुम्ही दिलेल्या पत्यावर आणून दिले जाईल.


आपल्या पैकी कोणाला PAN Card काढायचे असेल तर

संपर्क :- विलास अशोक जाधव 8286247881

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks