text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

घरबसल्या Online Driving लायसन्स

 घरबसल्या Online Driving लायसन्स

ड्रायविंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम, ते झाल आता सोपं...

 


मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे ही एक सोपी प्रक्रिया आहे, जर तुम्हाला रस्त्यावर स्कूटर, गाडी सारखे वाहन चालवायचे असेल तर तुम्हाला driving license  ठेवाव लागते. जर तुम्ही बाहेर वाहन चालवण्याचा सराव करीत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला learning license  घ्यावा लागेल . तुम्हाला वाहन कसे चालवायचे माहित असेल तरच तुम्हाला लर्निंग लायसन्सही मिळेल जर तुम्हाला योग्यरित्या वाहन चालवता येणे शक्य नसेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.


          प्रत्येकाची इच्छा असते आपल driving license चे काम ऑनलाइन घरी बसून झालेले बरे , म्हणून सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी ही सुविधा ऑनलाईन केली आहे. कोणतीही व्यक्ती घरून ड्रायव्हिंग परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकते, त्यासाठी आपल्याला कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही आणि एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत. परंतु आपल्याकडे सर्व आवश्यक driving license documents  उपलब्ध असतील तरच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते .    

लायसन्स काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे  Driving license documents :


वयाचा दाखला ( वय प्रमाणपत्र ) जसे - जन्म प्रमाणपत्र, हायस्कूल / दहावी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, सीजीएचएस कार्ड किंवा  जन्मतारखेचे प्रतिज्ञापत्र


आयडी पुरावा जसे - पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड इ.


पासपोर्ट साइज चे चार कलर फोटो

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन अर्ज । Driving License Apply Online  :


संकेतस्थळ -  Click Here 

Online application पूर्ण भरल्यानंतर काय करावं :


१ ) ऑनलाइन अॅप्लिकेशन पूर्ण भरून झाल्यानंतर , आपली physical driving test  सुरू करण्यात येईल .


२) आता आपल्याकडे दुचाकी, चारचाकी वाहन किंवा वाहन ज्यासाठी आपण अर्ज केले आहे, ते वाहन संबंधित अधिकाऱ्यासमोर तुम्हाला व्यवस्थितरीत्या चालवून दाखवावे लागेल.


3) शारीरिक ड्रायव्हिंग चाचणीसाठी, तुमचे वाहन तुमच्या बरोबर असावे लागेल. अथवा परिवहन ऑफिसचे वाहन उपलब्ध असल्यास ते वापरावं लागेल .


४) ही Driving test पास करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट देताना तुमच्या ड्रायव्हिंगबद्दल कधीही अतिउत्साह किंवा अतिविश्वास बाळगू नका.


५) तसेच समोर उभे असलेल्या अधिकाऱ्याच्या सर्व सूचनेचे पालन करून वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजेत.

६) जेव्हा संबंधित मोटार वाहन निरीक्षक तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टमध्ये पास असल्याचे घोषित करतील , त्यानंतर आपला अर्ज पूर्ण मंजूर होईल आणि काही दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळून जाईल .

 

आपल्या पैकी कोणाला ड्रायविंग लायसान काढायचे असेल किवा नाव पत्ता बदल करायचा असेल तर
संपर्क :- विलास अशोक जाधव
मो. 8286247881



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks