राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरती, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यात लवकरच तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच विधानसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात लवकरच तलाठ्यांची 3165 पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती (Talathi recruitment) केली जाणार आहे. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks