विकासा सोबतच रोजगार घेऊन आली "सिंधुरत्न समृद्ध योजना"_Sindhuratna Samrudh Yojna
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे "सिंधुरत्न समृद्ध योजना" होय. सिंधुरत्न या नावावरूनच आपल्या लक्षात येऊ शकत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडित योजना आहे. या योजने अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा येणार आहे. या योजनेमुळे रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा तसेच नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक परंपरा इत्यादीचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास या योजनेचा फायदा होईल.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सिंधुरत्न समृद्ध योजना राबवणार 2022
"सिंधुरत्न समृद्ध" योजनेची प्रमुख्य उद्दिष्ट्ये :-
1) सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व विकास क्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा "सूक्ष्म आराखडा तयार करणे व त्या आधारे परिणामकारक अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडविणे,
2) सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील तरूण उद्योजकांना स्थानिक स्तरावर "नवीन उद्योगधंदे" विकसित करण्यासाठी उपाययोजनाद्वारे प्रोत्साहित करणे.
3) सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीसाठी व्यक्तिगत दरडोई उत्पन्न वाढीकरीता "अतिरिक्त आर्थिक मदत" उपलब्ध करणे.
"सिंधुरत्न समृद्ध" योजनेचा कालावधी "सिंधुरत्न समृद्ध" योजना आर्थिक वर्ष 2022-23 ते 2024-25 या 3 वर्षांसाठी राबविण्यात येईल.
"सिंघुरत्न कार्यकारी समिती" चे मुख्यालय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय असेल.
अधिक माहितीसाठी खालील download बटन ला क्लिक करा.
या योजने अंतर्गत नोकरी उपलब्ध किमान शिक्षण 12वी पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील बटण ला क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks