text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पर्यावरण आणि हवामान विभागात संधी

 राज्याच्या पर्यावरण आणि हवामान विभागात काम करण्याची उत्तम संधी

 

महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पात्रता, निकष पूर्ण करणाऱ्या २० प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे

 

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 20 जागा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम २०२१-२२ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ ऑगस्टपर्यंत वेळ आहे. यासाठी पदव्युत्तर, रिसर्च स्कॉलर आणि पदवीधर यांना अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाची अधिकृत वेबसाइट envd.maharashtra.gov.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks