text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

Google Pay कडून ...

Google Pay कडून ग्राहकांच्या आधार , बँकिंग तपशीलांचा गैरवापर 

आधार, बँकिंग तपशीलांच्या गैरवापराचा आरोप, हायकोर्टाकडून स्पष्टीकरणाचे आदेश

अलीकडच्या काळात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे हे मोबाईल अॅप सर्रासपणे वापरले जाते. मात्र, गुगल पे ग्राहकांच्या आधार आणि बँकिंग तपशीलांचा गैरवापर करत असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ‘गुगल पे’कडून ग्राहकांचा डेटा अनधिकृरित्या साठवला जातो. गुगल पे एक खासगी कंपनी असल्यामुळे त्यांना अशाप्रकारे ग्राहकांची गोपनीय माहिती साठवण्याचा आणि वापरण्याचा अधिकार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. याचिका दाखल करणारे अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने रिझर्व्ह बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाला (UIDAI) यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

गुगल पे अॅपचा वापर करण्यासाठीच्या अटी-शर्तींमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की, कंपनी युजर्सच्या पेमेंट तपशीलांचा डेटा साठवेल. यामध्ये आधार आणि बँक अकाऊंटच्या माहितीचाही समावेश असेल. कोणत्याही खासगी कंपनीला अशाप्रकारे ग्राहकांची माहिती साठवता येत नाही. त्यामुळे गुगल पे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे याचिकाकर्ते अभिजित मिश्रा यांचे म्हणणे आहे.

‘Google पे’लाही स्पष्टीकरण देण्याचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकेवर नोटीस बजावताना Google इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks