बीएमसीमध्ये विविध पदांची भरती | BMC recruitment
बीएमसीमध्ये विविध पदांची भरती BMC recruitment
मुंबई महानगरपालिकेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation, BMC)पुन्हा एकदा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पालिकेतर्फे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे.
🔥पदे :-
💧 कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist)
💧 कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ डिप्लोमा (Junior Consultants Anesthetist Diploma)
वरील पदाच्या एकूण ४ जागा भरल्या जाणार आहेत.
🔥पात्रता :-
💧 एमडी, डिएनबी,एफसीपीएस किंवा कोणत्याही वैद्यकिय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे.
💧उमेदवाराला संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अुभव असणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला रेझ्युमेसोबत दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो खाली दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
🔥 पत्ता :-
उमेदवारांनी ही कागदपत्रे डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 4000022 या पत्त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत पाठवायची आहेत.
🔥 अंतिम तारीख :- 26 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन / जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks