🏅शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 🏅
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021
महत्वाच्या तारखा
🎈 ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी 3 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021
🎈 प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे 25 सप्टेंबर ते 10 ओक्टोंबर, 2021
🎈 परीक्षा 10 ओक्टोंबर, 2021
ऑनलाइन अर्ज करण्या विषयीचे टप्पे
१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट द्या .
२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करा.
३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.
६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.
७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर "Save & Preview" या बटनावर क्लीक करा.
८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)
१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून
ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन
पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.
१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.
आपल्या पैकी कोणाला Online form भरायचा असेल तर
संपर्क :- विकास अशोक जाधव 08286247881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks