text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🔵🔴कोरोना लसीकरण 💉 सर्टिफिकेट मिळवण्याचा व्हाट्सअँप नंबर...🔴🔵

कोरोना 💉लसीकरण 📜 सर्टिफिकेट डाऊनलोड करा "व्हाट्सअँप वर"

आतापर्यंत कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरण सर्टिफिकेट काढता येत होते. मात्र, आता भारत सरकारने व्हॉट्स अॅपशी भागीदारी केली असून, त्यामुळे कोरोना लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी केलीय.

म्हणजे आता तुम्हाला व्हॉट्स अॅपच्या माध्यमातूनही कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे. ते कसे डाऊनलोड करायचे, याबाबतची माहिती सोप्या पद्धतीने समजून घेऊ या..


  • आपल्या संपर्क यादीत (+91 9013151515) हा मोबाईल नं. Save ( जतन ) करा.

  • त्यानंतर व्हाट्सअँप open करा.

  • व्हाट्सअँप च्या contact (संपर्क यादीत ) प्रथम आपण save केलेला नं. शोधा.

  • त्या नं. ला प्रथम Download Certificate हा msg (संदेश ) पाठवा.



  • समोरून आपल्याला खालीलप्रमाणे msg येतील. आपल्या मोबाईल वर OTP येईल.

  • आपल्या मोबाईल वर आलेला OTP त्यांना पाठवा.
  • OTP पाठवल्यानंतर आपल्या नं. ने किती कोणाकोणाचे रेजिस्ट्रेशन केलं होत ते समजेल.


  • ज्या व्यक्तीचं सर्टिफिकेट पाहिजे त्या व्यक्तीचा त्या msg मधील नं. पाठवा. आणि PDF स्वरूपात सर्टिफिकेट मिळवा.🙏


💥अशा प्रकारे आपल्याला PDF स्वरूपात कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळेल.💥

* कोरोना लसीसाठी नोंदणी कुठे करावी?

www.cowin.gov.in द्वारे कोरोना व्हायरसच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. येथे सर्व डिटेल्स द्याव्यात. उमंग आणि आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे सुद्धा नोंदणी करू शकता.


* एका मोबाईल नंबरवर किती लोकांची नोंदणी होते?

एकाच मोबाइल नंबरवर 4 लोकांची नोंदणी होऊ शकते.


* आधार कार्डशिवाय लसीकरणाची नोंदणी होऊ शकते का?

होय, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि वोटर आयडीने नोंदणी करता येते.

 

* नोंदणीसाठी पैसे भरावे लागतात का?

नाही, नोंदणीसाठी शुल्क नाही.


* लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक का आहे?

ज्यांनी लस घेतली आहे त्यांच्यासाठी खुप आवश्यक आहे की त्यांनी व्हॅक्सीनेशनचे सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवावे. आवश्यकता भासल्यास त्याचा वापर करू शकता. प्रवासासाठी हे उपयोगी आहे. सर्टिफिकेट घेण्यासाठी उमंग अ‍ॅपद्वारे किंवा कोविन पोर्टलवरून सुद्धा डाऊनलोड करू शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks