text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

💳डेबिट कार्ड ची ओळख 🏧


💥ATM कार्ड / डेबिट कार्डची ओळख 💥

 अडचणीच्या वेळी बँकेत असलेले आपले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला बँक उघडण्याची वाट बघावी लागत नाही किंवा रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यासाठी ATM कार्ड / डेबिट कार्ड अत्यंत सोपी आणि सोयीस्कर सुविधा आहे.



डेबिट कार्ड म्हणजे काय? डेबिट कार्ड एटीएम कार्डासारखेच दिसते परंतु आपण केवळ रोकड काढून घेण्यापेक्षा बरेच काही करू शकता. डेबिट कार्ड पेमेंट गेटवेसह येते- एकतर व्हिसा, मास्टरकार्ड किंवा रुपे. व्हिसा आणि मास्टरकार्ड हे आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड आहे, तर रूपये फक्त भारतापुरते मर्यादित आहेत.


🔰ATM कार्ड / डेबिट कार्ड काढण्याच्या पद्धती :-


१. घर बसल्या इंटरनेटचा वापर करून ( Online ) :-


या पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलचा किंवा संगणकाचा वापर करून घरूनच बँकेच्या संकेतस्थळावर ( Bank website ) भेट देऊन अर्ज करावा लागतो.


२. बँकेला भेट देऊन ( Offline ) :-


या पद्धतीमध्ये आपल्याला बँकेला भेट देऊन एक अर्ज भरून त्याला आधार कार्डची प्रत जोडून बँकेत जमा करावी लागते.


🔰ATM कार्ड / डेबिट कार्डचे जाणून घेऊया फायदे :-


१. डेबिट कार्ड च्या मदतीने आपण जगात कुठेही असल्यास खात्यातून पैसे काढू शकतो.

२. आपल्या खिशात डेबिट कार्ड असल्यास खिशामध्ये भरपूर पैसे न ठेवता चोरीच्या भीतीपासून बिनधास्त राहू शकतो.

३. समजा आपण बाहेर आहोत आणि आपण पैसे घरीच विसरला आहात आणि आपल्या कडे जर डेबिट कार्ड असल्यास आपण बाहेर असतानाही हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो आणि डेबिट कार्डच्या मदतीने बिल देऊ शकतो.

४. डेबिट कार्डच्या मदतीने बिल ( Payment ) भरणे अगदी जलद व सोपे असते.

५. आपण डेबिट कार्डच्या मदतीने वीज बिल भरणा लांबलचक रांगेत उभे न राहता घरीच बसून भरू शकतो.


डेबिट कार्ड वापरण्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे डेबिट कार्ड चे तोटे देखील आहेत.


🔰ATM कार्ड / डेबिट कार्डचे जाणून घेऊया तोटे :-


१. जर आपले डेबिट कार्ड चोरीला गेले व चोरांना डेबिट कार्डचे गोपनीय अंक समजल्यास ते आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.

२. एटीएम मशीनमधून पैसे काढण्या अगोदर खात्री करा की एटीएम मशीन हे खात्रीतील बँकेचे आहे नाहीतर त्या एटीएम मशीन मधून आपल्या डेबिट कार्डची माहिती चोरी होण्याची शक्यता असते.

३. आपण डेबिट कार्डचा वापर केल्यास आपल्याला बँकेकडून अनेक मोबाइल संदेश ( Messages ) येत असतात जसे की किती पैसे काढले गेले आहेत, किती पैसे शिल्लक आहेत, किती पैसे जमा झाले. तर या संदेशांचे वार्षिक शुल्क, बँक आपल्या खात्यातून वजा करत असते.

४. प्रत्येक दिवशी डेबिट कार्ड चा वापर करून पैसे काढण्याची किंवा डेबिट कार्ड वापरण्याची मर्यादा असते जर तुम्ही त्याहून जास्त डेबिट कार्ड चा वापर केल्यास काही बँकांकडून यासाठीचे अधिक शुल्क खात्यातून वजा केले जाते.

💥सर्वात मोठा तोटा :- ATM कार्ड / डेबिट कार्ड असल्यामुळे खर्च करताना मोह आवरत नाही 💥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks