text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

25,000+ SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 

25,000+ SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 


 SSC GD Exam Date 2021

 आयोगातर्फे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), NIA, SSF आणि आसाम रायफल्समध्ये एकूण २५ हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी संगणक आधारित परीक्षेच्या (CBE) तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. ७ सप्टेंबर रोजी एसएससीने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान ही परीक्षा आयोजित केली जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 करोनामुळे होऊ शकतो तारखांमध्ये बदल

करोना साथीच्या सध्याची परिस्थिती पाहता आणि वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. SSC ने उमेदवारांना नियमितपणे आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देण्याची सूचना केली आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks