text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना | Pune Municipal Corporation


दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना | Pune Municipal Corporation


पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. १३ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. 


🌀 विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. सोबत आवश्यक मूळ कागद पत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत.

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना | Pune Municipal Corporation

काय आहे योजना? किती मिळणार मदत?

दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयोंची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना | Pune Municipal Corporation

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.

​योजनेसाठीची पात्रता

🔹योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.

 

🔸या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण आवश्यक.


🔹पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण आवश्यक.

 

🔸योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.

 

🔹योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला असावा.

 

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना | Pune Municipal कॉर्पोरेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks