text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज मिळणार | shop loan scheme

 दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज मिळणार


VJNT Loan Scheme वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती(VJNT) विकास महामंडळामार्फत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणा-या घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रु. २५,०००/- थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. VJNT Loan Scheme

तथापि, सध्याच्या परिस्थितीत लघु उद्योगांकरीता लागणा-या भांडवली व पायाभूत गुंतवणूकीमध्ये झालेली वाढ, कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली दरवाढ व सतत होणारी महागाई निर्देशांकातील वाढ इ. बाबी विचारात घेता रु. २५,०००/- इतकी थेट कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/- करण्यास महामंडळाच्या दि. २९/०९/२०२१ रोजीच्या झालेल्या मा. संचालक मंडळाच्या ११९ व्या बैठकीत मंजूरी दिली आहे. मा. संचालक मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 'VJNT Schop Loan Scheme'

VJNT Schop Loan Scheme'

योजनेचे उद्देश :-


१. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे.(VJNT)


२. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे,


३. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना आर्थिकदृष्टया सक्षम करणे,


४. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकाच्या व्यक्तींना व्यवसाय करण्याकरीता तात्काळ वित्त पुरवठा करणे, "VJNT Schop Loan Scheme"


५. सदर योजनांसाठी लघु व्यवसाय उदा. मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर,हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीटयुट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरूस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर.


६. मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे,


७. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ.लाभार्थीना तात्काळ / प्राथम्याने लाभ देणे.


लाभार्थी निवडीची पात्रता :- 


१. अर्जदार विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गातील असावा,


२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,


३. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे,


४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.(सक्षम प्राधिका-याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)


५. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल,


६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.


७. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल सादर करावा,


८. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.


शासन निर्णय पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा

1 टिप्पणी:

Thanks