text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोलीस शिपाई पदाची भरती | police shilai pdachi bharti


पोलीस शिपाई पदाची भरती 

police shilai pdachi  bharti


 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक, गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक ३१/१२/२०२० रोजी रिक्त असलेली १३६ पदे भरण्याकरीता, पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता केवळ गडचिरोली जिल्हयातील रहिवासी आवेदन अर्ज करु शकतात. तसेच हे उमेदवार नियुक्ती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली साठी पात्र असणार नाहीत.


🗞️ उमेदवारांने आवेदन अर्जात नमूद केलेली सर्व कागदपत्रे व पात्रतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असणे आवश्यक असल्याने, कागदपत्र पडताळणीच्या दिवशी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

police shilai pdachi  bhari



🔖या पोलीस शिपाई भरतीचे सर्व नियम व अर्ज करण्याची पद्धत, इत्यादी माहिती www.mahapolice.gov.in www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळावरून उमेदवारांनी भरतीबाबतची माहिती व प्राप्त करून अर्हता तपासावी.

❇️ एकूण जागा :- 136

❇️ नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली

❇️ फी : - खुला प्रवर्ग:-  450, मागास प्रवर्ग :- 350/-

📝अर्ज करायची पध्दत :-

 १. आवेदन अर्ज सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन पोमके पोलीस मुख्यालय, गडचिरोली, पोलीस उपमुख्यालय प्राणहिता ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून त्या ठिकाणी स्विकारले जातील व शुल्क रोखीने भरुण त्याबाबतची पावती देण्यात .


 २. आवेदन अर्जावर उमेदवाराने स्वतःचा अद्यावत (Latest) फोटो असावा.


३. (टिप:- उमेदवाराने आवेदन अर्जावर जोडावयाचा फोटो हा डोक्यावर कोणत्याही प्रकारची टोपी न घालता काढलेला असावा, कोणत्याही प्रकारची टोपी न घालता व चेहरेपट्टी स्पष्ट ओळखता येईल असा असावा प्रवेशपत्रावर अर्जावर दुसऱ्याचा फोटो / सही असल्यास सदर उमेदवारास भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.) आवेदन अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या फोटाच्या प्रती भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यापर्यंत सादर करणे अनिवार्य राहील. यासाठी अर्जदाराने कमीत कमी १० फोटोच्या प्रती स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

police shilai pdachi bharti


🛑 अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 5 जुन 22

🛑अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी


📚 लेखी परिक्षा : 

अपोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. लेखा परिक्षसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापूर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी खुल्या प्रवगातील उमेदवारांस ३५ टक्के व मागासप्रवर्गातील उमेदवारास ३३ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.)


🌐 उमेदवारांना आवेदन अर्जाबाबत विशेष सूचना:-

✍️ उमेदवाराने अर्जाची नोंदणी केल्यानंतर तो त्याच्या स्वतःच्या नावात, वडीलांच्या नावात, आईच्या नावात, जन्मदिनांक, दावा केलेल्या आरक्षणाचा प्रवर्ग, त्याचे स्वतःचे छायाचित्र व त्याची सही आदि मध्ये बदल करु शकत नाही. 

✍️ उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा खटला दाखल असेल तर त्या गुन्ह्याच्या खटल्याच्या प्रकरणातील सद्यस्थितीची माहिती देणे/ उघड करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्यातून खटल्यातून मुक्तता झाली असल्यास त्याबाबतसुद्धा माहिती देणे आवश्यक आहे. 

✍️ एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे आवेदन अर्ज भरावेत. नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास संबंधित बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र पडताळणीत सादर करावी, 

police shilai pdachi  bharti

 

🌐 उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष  :-

🔹 खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील. 

🔸शाळा सोडल्याचा दाखला/ १० वी चे प्रमाणपत्र, 

🔹जन्म दाखला, 

🔸१२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक 

🔹अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र, 

🔸संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राहा जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून). 

🔹समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक अशंकालीन / भुकंपग्रस्त होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राहा प्रमाणपत्र, 

🔸आधारकार्ड (ऐच्छीक). 

🔹छायाचित्र (फोटो) ५.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks