दहावी आणि बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी खास हा लेख. फेब्रुवारी आणि मार्च २०२२ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे
पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी
तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे
अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने
‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायची आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला,
तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १०
नोव्हेंबरला संपत आहे. या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य
मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचा तपशील –
तपशील : कालावधी
- माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबरपर्यंत
- पुनर्परीक्षार्थी/खासगी विद्यार्थी/श्रेणी सुधार योजना, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे/ आयटीआयचे विद्यार्थी : ११ ते २५ नोव्हेंबरपर्यंत
- माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २९ नोव्हेंबरपर्यंत
१०वी मार्च २३ ऑनलाईन आवेदन मुदत वाढी बाबत |
बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशील –
तपशील : कालावधी
- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : १५ नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि १६ ते ३० नोव्हेंबर (विलंब शुल्कासह)
- उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २ डिसेंबरपर्यंत
१२वी फेब्रुवारी २३ ऑनलाईन आवेदन मुदत वाढी बाबत |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks