text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MH SET EXAM-2022

 सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) 

महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु. जी. सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित 

सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ आयोजित करीत असलेली अडतिसावी ३८वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी दि. २६ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा) या केंद्रावर, घेण्यात येईल.


विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे संकेतस्थळावर अर्ज दि. १० नोव्हेंबर, २०२२ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. ०१ डिसेंबर, २०२२ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ०७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.  

परीक्षे चे नाव :- सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

शैक्षणिक पात्रता :- ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 

फी :- खुला प्रवर्ग ८००/-

अन्य ६५०/-

परीक्षा :- २६ मार्च २०२३

अधिकृत वेबसाईट http://unipune.ac.in/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks