महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात विविध पदांची भरती
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांची रिक्त व संभाव्य रिक्त पदे भरण्याबाबत संपूर्ण माहिती बघू, यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे.
पदाची सविस्तर माहिती
- महाराष्ट्र राज्य माहिती आयोगातील राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे एक रिक्त पद,
- राज्य माहिती आयुक्तांचे एक रिक्त पद
- राज्य माहिती आयुक्तांची दोन संभाव्य रिक्त पदे
अशी एकूण चार पदे भरण्यासाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्जदाराने राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त या पदांसाठी वेगवेगळे अर्ज सादर करावेत.
पात्रता :-
अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्तः-
(i) कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन आणि शासन या विषयांचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतील.
(ii) संसदेचा सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या, किंवा संघ राज्यक्षेत्राच्या विधानमंडळाचा सदस्य असणार नाही. किंवा इतर कोणतेही लाभपद धारण करणार नाही. किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाही किंवा कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाही.
अधिकृत वेबसाइट :- https://www.maharashtra.gov.in/
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांचा तपशील मराठी व इंग्रजीमध्ये सोबत जोडलेल्या विहित प्रपत्र व जोडपत्रासह, लिफाफ्यावर "राज्य मुख्य माहिती आयुक्त/राज्यं माहिती आयुक्त पदासाठी अर्ज" असे लिहून दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज पोस्टाने, अवर सचिव (माहिती (कार्यासन-६)), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२ आणि sic-application@gov.in या ई मेल पत्त्यावर ई मेलद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठवावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks