text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)

 

बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता

योजनेची सुरवात संपूर्ण राज्यात 2 ऑक्टोबर,2013

  • बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी  महाराष्ट्र शासन  कडून  मनोधैर्य  योजना  राबविण्यात  येत आहे.

  • बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.


  • हे लक्षात घेऊनच राज्यातील महिला आणि बाल विकास विभाग मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करीत आहे. याद्वारे पिडीतांना 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

  • माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या  आर्थिक निकषामध्ये बदल करून सुधारित मनोधैर्य योजना लागू करण्यात  आली आहे.

  • सिंगल विंडो सिस्टिम : या योजनेंतर्गत  अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक सहाय्य   पुरविणे  याबाबतची  सर्व प्रक्रिया राज्य/ जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण याना हस्तांतरण  करण्यात आली आहे .

  • ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश -सुधारित योजनामध्ये ITPA अधिनियमांतर्गत  सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही  सहाय्य करण्यात येते.

    शासन निर्णय :- मनोधैर्य योजना
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks