text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

आयकर विभागात नोकरी दहावी पास

 आयकर विभागात विविध पदाची भरती

आयकर विभागात काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे.

एकूण जागा :- 21

पदे खालील प्रमाणे :-

  1. मल्टी टास्किंग स्टाफ- ५ पदे
  2. टॅक्स असिस्टंट – ११ पदे
  3.  स्टेनोग्राफर ग्रेड २ – ५ पदे

शैक्षणिक पात्रता :-

पद 1:- मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.

पद 2:- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त ८००० शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.

पद 3:- उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ८० शब्द प्रति मिनिटच्या वेगाने १० मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये ६५ शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :-

सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज खालील पत्त्यावर पाटवायचा आहे :-

उमेदवारांनी आपला अर्ज  रुम नंबर -३७८ ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली – ११०००२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. 

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत 
अधिकृत जाहिरात आणि अर्ज कसा भरायचा ते पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 
 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks