text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण योजना 2021-22 कार्यक्रम

 नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण योजना 2021-22 कार्यक्रम

एमएसएमई, नवी दिल्ली व सिपेट: सीएसटीएस, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल एस.सी./ एस.टी. हब (NSSH/NSIC) योजने अंतर्गत जे उद्योजक होवू इच्छितात किंवा उद्योजक आहेत अशा एस.सी., एस.टी., युवक / युवतींसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (Capacity Building Training) खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

(निवास व जेवणाची व्यवस्थासह)

सिपेट, औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) येथे कौशल्य विकास योजने अंतर्गत निरुद्योग/बेरोजगार युवक/ युवतीसाठी (SC/ST) मोफत प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे, प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुक युवक/युवतींनी प्रवेशाकरिता खालील पत्त्यावर तात्काळ संपर्क साधावा: सिपेट, प्लॉट नं जे ३/२,एम आय डी सी चिकलठाणा, औरंगाबाद. मो: 9923185048


👉 SC, ST, Offline form - येथे क्लिक करा

पात्रता व अटी :-

1. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

2. सदर प्रशिक्षणाकरिता उद्योजक असणाऱ्या किंवा उद्योजक होवु इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.) व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

3. सर्व प्रशिक्षण संदर्भात प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख, प्रशिक्षण कालावधी, अर्ज स्विकारणे/ नाकारणे, प्रवेश क्षमता, शैक्षणिक पात्रता ई. बाबतचे सर्व हक्क / अधिकार संस्थेकडे राखीव असतील.

4. नंदुरबार, वाशीम, उस्मानाबाद व गडचिरोली या जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.


5. इच्छुक उमेदवारांनी सिपेटची वेबसाईट : www.cipet.gov.in/centres/cipet-aurangabad वरील अर्जाची प्रिंट काढुन त्यासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या (आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, उद्यम आधार, मार्कशीट, टि.सी, वयाचा दाखला, इ.) छायांकित प्रती जोडून त्या पोस्टाद्वारे / ई-मेलने खालील पत्त्यावर दिनांक २८ जानेवारी २०२२ पर्यंत किंवा त्या अगोदर पोहोचेल असे पाठवावे.

6. उमेदवारांना मुलाखतीकरीता सिपेट : औरंगाबाद येथे स्वखर्चाने मुळ कागदपत्रांसह हजर रहावे लागेल. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

सिपेट : सेंटर फॉर स्किलिंग अॅण्ड टेक्नीकल सपोर्ट, प्लॉट क्र. जे-3/2, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, औरंगाबाद 431006

ईमेल : cipetaurvtc2019@gmail.com

वेबसाईट : www.cipet.gov.in

अधिक माहितीकरिता संपर्क : 9923185048 फोन नं. (0240) 2478317


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks