text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

GDS निवड झाली पुढे काय... | India Post GDS Maharashtra

(India Post GDS Maharashtra )

 भारतीय पोस्टच्या महाराष्ट्र सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. या भरतीद्वारे महाराष्ट्र टपाल विभागात 2428 पदांची भरती केली जाणार आहे.

निवड :- या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे (India Post GDS Maharashtra ) दहावीच्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे.

India Post GDS Maharashtra
India Post GDS Maharashtra

रिक्त जागांचा तपशील:-

जाहीर केलेल्या नोटिफिकिशननुसार महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये 2428 पदांची भरती होणार आहे.


सर्वसाधारण प्रवर्गासाठी :- 1105

आर्थिक दुर्बल घटकासाठी :- 246

ओबीसीसाठी :- 565

अनुसूचित जातीसाठी :- 191

अनुसूचित जमातीसाठी :- 244 

पीएच प्रवर्गासाठी :- 77

अशा प्रकारे 2428 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.


निवड झाले नंतर आवश्यक कागदपत्रे

1. 10 वी मार्कशीट/ सर्टिफिकेट 

2. संगणक प्रमाणपत्र ( दहावी ICT हा विषय झाला असेल तर संगणक प्रमाणपत्र आवश्यक नाही )

3. जात प्रमाणपत्र  

4.अपंग असेल तर तसे प्रमाणपत्र 

5. आधार कार्ड/ पॕन कार्ड

6. फोटो 

 

कागदपत्रे पडताळणी वेळी वरील सर्व ओरिजनल कागदपत्रे व झेराॕक्स प्रती लागतील. कागदपत्रे पडताळणी संबंधित विभागातील IP, ASP, SSP या अधिकाऱ्यांकडून केली जाते.


कागदपत्रे तपासणी झालेनंतर, चारित्र्य प्रमाणपत्र , मेडिकल तपासणीसाठी लागणारे फाॕर्म आॕफिसकडून दिले जातात.


मेडिकल प्रमाणपत्र जमा केलेनंतर तुम्हाला कामावर हजर करुन घेतले जाते. काही दिवसात provisional आॕर्डर मिळते. 


Security bond साठी 4-5 हजार भरावे लागतील. नवीन नियमानुसार 1 लाख चा security bond केला आहे. हा एक प्रकारचा बाँड आहे. आपण सही करुन तो जमा करावा लागतो. 1 लाख रुपये भरायचे नाहीत. 

(India Post GDS Maharashtra )

OBC update

OBC साठी central चे प्रमाणपत्र लागते. काही अर्जदारानी state चे अपलोड केले आहे. पण तुमच्या निवडीवर याचा काही परिणाम होणार नाही. निवड होणार. कागदपत्रे पडताळणी वेळी तुम्ही central चे सबमिट करु शकता. 

       जर central चे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तात्पुरते state चे सबमिट करु शकता. Provisional order मिळते. सहा महिन्यानंतर fix order मिळते. पण या कालावधीत तुम्हाला central प्रमाणपत्र सबमिट करावे लागेल. जो पर्यंत तुम्ही central चे प्रमाणपत्र सबमिट करत नाही, तो पर्यंत तुम्ही fix आॕर्डर दिली जात नाही...कागदपत्र पडताळणी वेळी नाॕन क्रिमिलेअर पण लागेल..


EWS साठी नाॕन क्रिमिलेअर लागत नाही.


अर्जाची प्रिंट असेल तर सोबत ठेवा. नसेल तर काही गरज नाही. तुमच्या अर्जाची प्रिंट काॕपी संबंधित निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असते.

अधिकृत नोटीस पाहण्यासाठी 👈👉येथे क्लिक करा 

BEST 👍OF LUCK 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks