text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे. Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

योजनेच्या अटी :- 

♨️ विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

♨️ या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुण असणार आहे.

♨️ विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे.

♨️ विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा. Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

♨️ गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

♨️ विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

♨️ विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे.

♨️ सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.


स्वाधार योजना कागदपत्रे.

🌀स्वाधार योजना अर्ज परिपूर्ण भरलेला,

🌀अर्जदाराचा जातीचा दाखला,

🌀महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा,

🌀मागील वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा नौकरी असल्यास फॉर्म न.१६,

🌀विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्न दाखला,

🌀आधार कार्ड ची सत्यप्रत,

🌀दिव्यांग विद्यार्थी असल्यास प्रमाणपत्र,

🌀दहावी, बारावी किंवा पदवी गुणपत्रक जे लागु असेल,

🌀बोनाफाईड महाविद्यालय कडून घ्यावे,

🌀स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र,

🌀महाविद्यालय उपस्थिति प्रमाणपत्र,

🌀विद्यार्थी शासकीय वस्तिगृहात प्रवेशित नसल्याचे शपतपत्र,

🌀विद्यार्थी जेथे राहतो त्याचा पुरावा,

🌀बैंक पासबुक ची सत्यप्रत,

🌀R.T.G.S. प्रमाणपत्राचा नमुना,

🌀आधार व बैंक खाते नंबर लिंक केल्याचा पुरावा.

महाविद्यालयाकडून सर्व माहिती प्रमाणित केल्यावर व सर्व आवश्यक कागदपत्रे जोड्ल्यावर ही आपणास काही अडचन येत असेल तर swadhar helpline वर Contact करावा. Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana


कार्यालय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण,
पत्ता :- आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, 3 चर्चरोड, पुणे  411001,
दूरध्वनी क्रमांक :- 020-26127569
ई-मेल :- swadhar.swho@gmail.commin.socjustice@maharashtra.gov.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks