text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

RTE प्रवेश प्रक्रिया 2022-23

RTE प्रवेश प्रक्रिया 2022-23

पालकांसाठी सूचना :- 

1. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आपल्या शाळेत किमान 25% प्रवेश देण्याची तरतूद केलेली आहे.

2. 25 % अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. पालकांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. कृपया पालकांनी यांची नोंद घ्यावी.

3. प्रवेशाकरिता वेबसाईट आहे - https://rte25admission.maharashtra.gov.in/ adm_portal/Users / rteindex

4. सदरची प्रवेश प्रक्रीया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने दिनांक 16/02/2022 पासून सुरु होत आहे.

5. वंचित घटकामध्ये अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST), भटक्या जमाती (NT), इतर मागास प्रवर्ग (OBC) या जातीचा समावेश आहे.

6. वंचित घटकांचे जातीचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाहीत

7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील पालकांनी आपला रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख) च्या आतील उत्पन्नाचा दाखला शाळेत जमा करणे आवश्यक आहे.

8. उत्पन्नाचा दाखला हे संबंधित प्राधिकरण ( तहसिलदार कार्यालय) यांनी प्रमाणित केलेला असावा.

9. पालकांनी दिलेला उत्पन्नाच्या दाखल्याची तपासणी / पडताळणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय संबंधित तहसिल कार्यालयाशी करतील. ज्या पालकांचे उत्पन्नाचे दाखले बनावट निघतील अशा पालकांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

10. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेताना सदर विद्यार्थ्यांचे वय दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी किमान वय 6 वर्षे 0 महिने व जास्तीत जास्त 7 वर्षे 2 महिने इतके असणे अनिवार्य आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये 6 वर्षे 6 महिने वर्ष वयाच्या आधीची बालके इयत्ता 1 ली मध्ये नोंदविली जाणार नाहीत. कृपया पालकांनी याची नोंद घ्यावी.

11. शाळेचा प्रवेश स्तर इयत्ता पहिली असल्याने शैक्षणिक वर्ष 2022-2023 करीता 25% अंतर्गत प्रवेश फक्त इयत्ता पहिली मध्येच मिळेल. इतर इयत्तामध्ये प्रवेश मिळणार नाही.

12. ऑनलाईन वर सुचित केल्याप्रमाणे अर्ज भरण्यात यावा.

13. महत्वाचे म्हणजे उत्पन्नाचा मुलांचे वय 6 वर्षे पूर्ण हवे फक्त पहिली ला ऍडमिशन होते अनुदानित शाळा अल्पसंख्याक शाळेत होत नाही फक्त प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन होईल.

हमीपात्र पाहण्यासाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


1) सरकारी नोटिफिकेशन 22-23

2) सरकारी नोटिफिकेशन 22-23






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks