text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय / अर्ज | Maji kanya bhagyashree yojna

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय / अर्ज
 Maji kanya bhagyashree yojna

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ अन्वये "सुकन्या" योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ दिनांक ०१ जानेवारी २०१४ पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञेय आहेत. तसेच केंद्र शासनाने "बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ" ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे.


शासन निर्णय: उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्देशासाठी संदर्भाचिन शासन निर्णयान्वये "सुकन्या योजना" दिनांक ०१ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आली आहे. या • योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नांवे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १,००,०००/- एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. "माझी कन्या भाग्यश्री" या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली "सुकन्या" ही योजना विलीन करून व त्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करून "माझी कन्या भाग्यश्री" ही योजना संपूर्ण राज्यात आहे. Maji kanya bhagyashree yojna


योजनेचे स्वरूप :- “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये पुढीलप्रमा 2 प्रकारचे लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अनुज्ञेय राहतील. एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील.


👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈


या योजनेची उद्दिष्टे :-

 १) लिंग निवडीस प्रतिबंध करणे,

 २) बालिकेचा जन्मदर वाढविणे.

 ३) मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे.

 ४) बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहानाकरीता समाजात कायमस्वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे..

 ५) मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.

 ६) सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे..

 ७) जिल्हा, तालुका व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.


योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती :- "सुकन्या" योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या "माझी कन्या भाग्यश्री" या योजनेत करण्यात आल्यामुळे "सुकन्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती "माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये लागू करण्यात येत आहे. तसेच "सुकन्या योजनेतील मुलींना "माझी कन्या भाग्यश्री" या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.  Maji kanya bhagyashree yojna

(१) सदर योजना सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्ड धारक) कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल. 

(२) सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

(३) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक 20 राहील.

(४) विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील. तसेच तिने इयत्ता १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.

(५) दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली प्रकार-२ प्रमाणे योजनेस पात्र असतील,

 (६) एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षापेक्षा कमी) इतके असावे.

(७) बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.

(८) प्रकार १ च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार-२ च्या लाभार्थी कुटुंबारा दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.

(९) सदर योजनेअंतर्गत १८ वर्षानंतर एल.आय. सी. कडून जे रु.१,००,०००/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रु. १०,०००/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरुन संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.

(१०) सदर योजनेच्या टप्पा-२, टप्पा-३ व टप्पा-४ मध्ये नमूद केलेले लाभ लाभार्थीस पोषण आहार तथा वस्तु स्वरुपात देय राहतील.

(११) ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील.


👉माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज येथे क्लिक करा 👈


योजनेच्या अंमलबजावणी करीता यंत्रणा व अर्ज करण्याची कार्यपध्दती:

सदर योजनेअंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नांवाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र- 'अ' किंवा 'ब' मध्ये अर्ज सादर करावा. अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने प्रकार-१ चा लाभ घ्यावयाचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. Maji kanya bhagyashree yojna तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील. सदर अर्जाची छाननी अंगणवाडी सेविकेने करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी सेविकेने पर्यवेक्षिका / मुख्यसेविकेकडे सादर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks