प्रधानमंत्री आवास योजनेतील विजेता आणि प्रतीक्षा यादी 30/03/2022
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सदनिका बांधणे कामी पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील “परवडणारी घरे घटक क्र. ३” या घटका अंतर्गत वडगाव खु., खराडी येथे प्रत्येकी एक व हडपसर येथे तीन असे एकूण पाच गृह प्रकल्पांमध्ये एकूण २९१८ सदनिकांच्या बांधकामाचे काम सुरु आहे.
साधारण ३००-३२० चौ.फूट क्षेत्रफळाच्या या १bhk सदनिकांची सरासरी किंमत ही रु. १० ते १२ लाख प्रति सदनिका इतकी आहे. याचसोबत या सदनिकांना सोलार वॉटर हीटर, एसटीपी, इ. सारख्या एकूण १४ विशेष सुविधा उपलब्ध आहेत.
यापूर्वी, २४ ऑक्टोबर २०२० रोजी २९१८ सदनिकांसाठी संगणकीय सोडत झाली होती. मात्र जागतिक महामारीमुळे ठराविक विजेत्यांना १०% स्वहिस्स्याची रक्कम वा उत्पन्नाच्या स्त्रोताभावी बँकेचे गृहकर्ज मिळणे शक्य झाले नाही. तसेच काही कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्यामुळे काही सदनिकाधारक या योजनेतून बाद झाले. यामुळे एकूण १०३० सदनिका रिक्त झाल्या. या सदनिकांसाठी एकूण १६५४५ अर्ज नव्याने प्राप्त झाले. या सदनिकांसाठीची दुसरी संगणकीय सोडत दि. ३०/०३/२०२२ रोजी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त मा. श्री. रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते पार पडली.
🌐 अधिकृत लिंक :- https://www.pmc.gov.in/mr/
या सर्व गृह प्रकल्पांचे ५०% काम पूर्ण झालेले असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी, विजेत्यांनी नेमलेल्या वेळेत पूर्तता करावयाच्या कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे -
📘आधार कार्ड
📙उत्पन्नाचे प्रमाणपत्र
📗पॅन कार्ड
📘पत्त्याचा पुरावा
📙सह-अर्जदाराचे आधार कार्ड
📗२ फोटो
📘बँकेचे पासबुक
📙ईमेल
📗जातीचा दाखला (लागू असल्यास)
प्रकल्पा नुसार विजेत्यांची यादी खालील प्रमाणे:-
1) स.न. 106 ए 16 ए (पी) + 17 (पी) + 18 (पी), हडपसर
2) स.न. 106 ए / 12 बी / 3 बी (पी), हडपसर, पुणे
3) स.न. 89 (पी) + ९२ (पी) हडपसर, पुणे
4) स.न. 57-5 (पी), प्लॉट नंबर 1 ए, खराडी, पुणे
5) स.न. 57-5 (पी), प्लॉट नंबर 1 बी, खराडी, पुणे
6) स.न. 39 (पी) + स. न .40 (पी), वडगाव (ख), पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks