text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर सदस्याची नियुक्ती Minority Department

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर सदस्याची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्याबाबत.

“मुस्लीम कायद्यांचे ज्ञान व आकलन असलेली एका व्यक्तीची” न्यायाधिकरणावर एक सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची आहे. त्यास अनुसरुन या सदस्यांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने निवड करण्याकरिता शासनाने एक समिती गठित केलेली आहे. सदर न्यायाधिकरणावर सदस्य म्हणून काम करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवाराकडे पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.

Minority Department


पात्रता :-

१) या समितीद्वारे नियुक्त केला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचा सदस्याला मुस्लीम कायद्याचे ज्ञान व आकलन असणे आवश्यक असेल.

२) या समितीद्वारे नियुक्त केला जाणारा महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचा सदस्य हा अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली असेल

३) या समितीद्वारे महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या नियुक्तीच्या वेळी ४५ वर्षापेक्षा कमी वय नसावे.  

'Minority Department'

४) या समितीद्वारे न्यायाधिकरणावर सदस्याची नियुक्ती करतांना उर्दू भाषेचे समुचित ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल.

५) या समितीद्वारे नियुक्त सदस्याचा कार्यकाळ हा त्याने आपल्या पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ वर्ष असा असेल.

६) या समितीद्वारे नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्याला मासिक अंदाजे रु.१.०० लक्ष मानधन अनुज्ञये असेल.

७) या समितीद्वारे नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्याला लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल व त्यांच्या सेवा त्यांना अनुज्ञेय असलेल्या सेवा नियमांद्वारे शासित केल्या जातील.

अंतिम तारीख :- १५ एप्रिल २०२२

Minority Department

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- अवर सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई - ४०० ०३२

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks