text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

अपंग विद्यार्थ्यांसाठी सुर्वणसंधी

संपूर्ण महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी सुर्वणसंधी

महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, पुणे

जागृत अपंग संघटना संचलित महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र पुणे हि संस्था अपंगाचे शिक्षण, प्रबोधन, पुनर्वसन व क्रिडा या चौसुत्री कार्यक्रमाव्दारे गेल्या ३० वर्षापासुन कार्यरत आहे.


 येथे सन १९९० पासून संस्थेत वय वर्ष १६ ते ३० वयोगटातील कमीत कमी चौथी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण व शहरी भागातील अपंग विद्यार्थासाठी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय. प्रशिक्षणाची तसेच वसतीगृहासह निवास भोजनाची मोफत सुविधा पुरविण्यात येते. एक वर्ष प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणाबरोबर तीनचाकी सायकल, शस्त्रक्रिया, क्रचेस, कॅलीपर्स व्यावसायासाठी जागा तसेच अपंग वित्त महामंडळ, मुंबई यांच्यातर्फे ५०,०००/- पर्यंत आर्थिक मदत कजाव्दारे पुरविण्यात येते. जास्तीत जास्त अपंगाना व्यावसायिक प्रशिक्षणाव्दारे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना स्वःतच्या पायावर उभे करणे, प्रशिक्षणा बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करून आदर्श नागरीक म्हणुन या साठी प्रसत्न करणे. अपंगाचा सर्वागिण विकास साधुन त्यांना सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा मिळुवन देणे. माहितीपत्रकात दर्शविलेल्या प्रशिक्षणापैकी कोणत्याही एका प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेऊन स्वतःचा रोजगार स्वःत निर्माण करुन उत्तम व्यावसायिक होण्यासाठी संस्थेचा पत्यावर समक्ष भेटा अथवा पत्राव्दारे आपला प्रवेश अर्ज त्वरीत मिळवा.

महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, पुणे

संपर्क :-  माण, सिध्दीविनायक पेट्रोलपंपासमोर, हिंजवडी आय. टी पार्क जवळ, पुणे -४११०५७, मो. : ९८२२०१०५१० वेबसाईट: www.mpapk.org | इमेल: maan.mpapk@gmail.com


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks