text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’ Earn and Learn plan

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’

योजनेचे नाव: जिल्हा परिषद सेस फंडातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’

 

योजनेचा मूळ उद्देश:-

विद्यार्थ्यांना १२वी पुढील पदवी शिक्षणाची संधी मिळावी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अर्थार्जन सुद्धा व्हावे.  

Kamva ani shika

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारावी पास असलेल्या किंवा नुकतेच पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या होतकरू आणि गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, पुढील पदवीचे शिक्षण घेताना / घेतल्यावर नोकरीसाठी आवश्यक ते सर्व ज्ञान – कौशल्ये ही त्यांच्या दैनंदिन कामातून मिळावीत, असे प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण घेताना त्यांना ३ वर्षासाठी निश्चित विद्यावेतन सुद्धा मिळावे यासाठी जि. प. सेस फंडातून नावीन्यपूर्ण योजना राबवावी अशी बाब रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विचाराधीन होती. सबब रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग मध्ये तीन वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना राबविली जाणार आहे

 

योजनेच्या लाभाचा तपशील:-

दरवर्षी किंवा प्रथम तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्याने केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. ८,०००/- दुसर्‍या वर्षी रु. ९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.  

Kamva ani shika

सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachler in Business Administration (Service Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापराकरिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, (एमकेसीएल) यांच्या मार्फत Non-Returnable basis वर एक उत्तम स्मार्टफोन सुद्धा मोफत दिला जाणार आहे.


 
योजना अटी आणि शर्ती:

१) लाभार्थी हा रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
२) लाभार्थी विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील व किमान बारावी पास असावा.
३) लाभार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये शाखानिहाय (विज्ञान, कला, वाणिज्य, समकक्ष इतर शाखा) मिळालेल्या सर्वोच्च गुणांनुक्रमाचा इंटर्नशिप निवडीवेळी प्राधान्याने विचार केला जाईल.
४) लाभार्थी हा संगणक साक्षर असावा.
५) दिनांक ३० जून २०२२ रोजी लाभार्थ्याचे वय हे १८ पूर्ण ते २५ वर्षे दरम्यान असावे.
६) लाभार्थी हा रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
७) बीबीए पदवी अभ्यासक्रमासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे लाभार्थ्याला पालन करावे लागेल.
८) इंटर्न म्हणून काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत निवड पत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची प्रती वर्ष रु. २०,०००/- या प्रमाणे ३ वर्षे फी ही स्वत: भरावयाची आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या कार्यआधारित पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्याची प्रवेश निश्चिती केल्यावरच इंटर्नशिप सुरू होणार आहे.  
९) कामाच्या संदर्भात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याची असेल. सदर नियमांचे पालन न झाल्यास अथवा समाधानकारक काम नसल्यास अशा विद्यार्थ्याची कार्यालयीन सेवा कधीही थांबविण्याचा अधिकार हा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला असेल.
१०) सदर योजना ही तीन वर्षानी बीबीए पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास रत्नागिरी जिल्हा परिषदे मध्ये कायमस्वरूपी अथवा कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीची ऑफर / आश्वासन देत नाही.
११) इंटर्नशिपसाठी रुजू होतेवेळी विद्यार्थी उमेदवाराने, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दिलेले ऑफर लेटर काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यातील दिलेले नियम आणि अटी व शर्तींचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यन्त काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याने इंटर्नशिप अर्धवट सोडून जाऊ नये म्हणून बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.
१२) सदर योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यास कोणत्याही नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही. तसेच सदर निवडीच्या आदेशाने त्यांना कोणत्याही न्यायालयात वा प्राधिकरणाकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवेत नियमित करण्यास्तव दाद मागता येणार नाही.
१३) इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.

Kamva ani shika

आवश्यक कागदपत्रे:-

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) जात प्रमाणपत्र
४) शिधापत्रिका- मागील आणि पुढील बाजू
५) दहावी उतीर्ण प्रमाणपत्र
६) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
७) MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
 

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दिलेल्या पुढील साईटवर https://tinyurl.com/zpratibba2022 वर जाऊन स्वारस्य (इच्छुक असल्याबाबत) अर्ज करावा.  

अंतिम दिनांक २५ जून २०२२

 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks