ठाणे महानगर पालिकेत विना परीक्षा भरती Thane Mahanagarpalika Recruitment 2022
ठाणे महानगर पालिकेत भरतीविनापरीक्षा थेट मुलाखत
ठाणे महापालिका भरतीअंतर्गत (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) विविध पदाची भरती होणार आहे. या साठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्या पदाची तपशील वार माहिती आज पाहू.
अटेंडंट (Attendant), ज्युनिअर अटेंडंट (Junior Technician), ज्युनिअर टेक्निशियन (Junior Technician), एक्स रे टेक्निशियन (X-ray Technician) या पदांच्या एकूण ५४ जागा भरल्या जाणार आहेत.
यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. या पदांसाठी पात्र उमेदवाराची मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
मुलाखती साठी पत्ता खाली पाहणार आहोत. ही मुलाखात 14 जून 2022 रोजी होईल.
मुलाखतीचे ठिकाण :- 1) राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय
2) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा
वरील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी सकाळी 10 वाजता 14 जून रोजी उपस्थित रहावे लागणार आहे.
मुलाखतीला जाताना सर्व मुळकागदपत्रे सोबत ठेवावी. तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे छायांकित आणि स्वयं साक्षांकित करून अर्जा सोबत जोडावी. नमुना अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मानधन :- 20,000/- ते 25,000/- (वीस ते पंचवीस हजार)
अधिकृत वेबसाईट :- https://thanecity.gov.in/
पदे आणि पात्रता खालील प्रमाणे :-
1) पदाचे नाव :- अटेंडंट
एकूण जागा :- 24
मानधन :- 20,000/-
पात्रता :- मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अटेंडंट पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
2) पदाचे नाव :- ज्युनिअर टेक्निशियन
एकूण जागा :- 23
मानधन :- 25,000/-
पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर इन रेडीओलॉजीचे शिक्षण घेतलेले असावे.तसेच उमेदवाराकडे ज्युनिअर टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा.
हे ही वाचा :- या महानगर पालिकेत विना परीक्षा भरती
3) पदाचे नाव :- ईसीजी टेक्निशियन
एकूण जागा :- 1
मानधन :- 25,000/-
पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून फिजिक्समध्ये पदवी घेतलेली असावी. तसेच उमेदवाराकडे ईसीजी टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा.
4) पदाचे नाव :- एक्सरे टेक्निशियन
एकूण जागा :- 6
मानधन :- 25,000/-
पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर इन रेडीओलॉजीचे शिक्षण घेतलेले असावे. तसेच उमेदवाराकडे एक्सरे टेक्निशियन पदाचा किमान अनुभव असावा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटण वर क्लीक करा.
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks