text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना  प्रतीवर्षी १०,०००/- (दहा हजार) इत्यादी लाभ

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

 देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना- सन 2022-23 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ.

 देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विध्यार्थाना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२२-२३ करिता विध्यार्थांकडून जाहिराती द्वारे अर्ज मागविण्यात आले  होते.

तथापी शैक्षणिक संस्था मधील सन २०२२-२३ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही . सबब आयुक्तालयाचे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ च्या जाहिरातीदवारे मागविण्यात आलेल्या उपरोक्त अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . 

अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ( जलद दुवे रोजगार ) या संकेतस्थळावर भेट द्यावी . 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६. १५ वाजेपर्यंत आहे . 

सदर  योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत अटी  शर्ती निकष पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा . 


 
या योजने अंतर्गत खालील लाभ मिळतील 

१) अभ्यासक्रमासाठी संपूर्ण शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क , नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क विध्यार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल . 

२)वसतिगृह शुल्क , भोजन शुल्क विध्यार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल .

३) पुस्तकांसाठी  ५०००/- व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी ५०००/- अशी एकूण १००००/- प्रत्येक वर्षी संबंधित विध्यार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल .

 

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 


 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks