text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

लेक लाडकी योजना -2023

 लेक लाडकी योजना -2023

मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक ५ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये "मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील." अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सदर योजने अंतर्गत खालील अटी शती व त्याकहरता नमूद आवश्यक कागदपत्रे याांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानांतर 5 हजार रुपये, इयत्ता पाहिलीत  6 हजार रुपये, सहावीत 7हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभाथी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये
याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000/- एवढी रक्कम देण्यात येईल.

अटी व शर्ती:- 

१) ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. 

२) पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. 

३) तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 

४) दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 

५) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. 

६) लाभार्थी बैंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. 

७) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजनेचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

लेक लाडकी योजनेचा अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks