मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
योजनेची ठळक वैशिष्टे
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
या योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या लिंक चा वापर करा.
लाभार्थी निवडीचे निकष
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
अर्जदार शेतक-यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे?
एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सौर कृषीपंपाचे फायदे काय आहेत ?
- शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
- वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, कमी वीजेच्या दाबामुळे किंवा सिंगल फेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही.
- विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही.
- कमीतकमी रखरखावची आवश्यकता.
- विजेची तार तुटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही.
- पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत.
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- विधी 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks