अण्णासाहेब पटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना
अण्णासाहेब पटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना
👉 महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारी अण्णासाहेब पटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना ही आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करणारी महत्वाची योजना आहे.
📌 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांकासह व स्वतःचा ई-मेल आयडी)
- रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला / लाइट बिल / रेशनकार्ड / ग्रॅम बिल / बँक बुक)
- उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला / आयकर रिटर्न)
- जातिचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा
- लग्न झालेल्या महिलांसाठी – पॅनकार्ड / विवाह दाखला / गॅझेट
- एक पानी प्रकल्प अहवाल (वेब पोर्टलवर उपलब्ध)
- स्वतः घोषणापत्र (वेब पोर्टलवर उपलब्ध)
🖊️ अर्ज प्रक्रिया:
🔗 इच्छुक लाभार्थ्यांनी udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज केल्यानंतर Letter of Intent (LOI) मिळते. त्यानंतरच बँकेतून कर्ज मंजुरीसाठी अर्ज करावा लागतो.
ℹ️ महत्वाची टीप:
योजनेनुसार आवश्यक कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा जिल्हा अण्णासाहेब पटील महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा.
📢 नोकरी व शासकीय योजना अपडेट्स साठी आमचा WhatsApp चॅनेल 'Job ची माहिती' जॉइन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks