text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

माणसा आता तरी जागा हो!

 आज (3 एप्रिल 21) फ्रान्स ची बातमी बघितली, आणि पुन्हा एकदा डोळे उघडले. फक्त फ्रान्स चीच नव्हे तर जगात आज अजून काही देशात अशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात काय वेगळी परिस्थिती नाहीय. मृत्यू नंतर देखील शेवट होताना वाट पहावी लागतेय तिथे देखील नंबर.... Line लावावी लागतेय. प्रेताना अग्नी देण्यासाठी ती प्रेत घेऊन सरकारी कामगार नातेवाईक वाट पाहत आहेत. काही देशांमध्ये तर सांगाडे काढून तिथे प्रेत दफन केली जात आहेत. जागा कमी पडतेय.


माणसा आता तरी जागा हो 🙏


जगात आम्ही साक्षरतेत, स्वच्छतेत अव्वल असलं पाहिजे. परंतू आज आपण करोना ग्रस्त जिल्ह्याच्या यादीत पुढे राज्यांच्या यादीत अव्वल. ही चिंताजनक बाब आहे... आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी माझ्या परीने विनंती करण्यासाठी हे लिहिण्याचा प्रपंच....


आम्हाला आमची काही जबाबदारी आहे कि नाही ??? आम्ही ₹10/-  ₹15/- रुपयांचे मास्क वापरून शक्तिमान सारखं फिरतो. आपल्याला या आजाराच काहीच गांभीर्य नाही असं आपण वागतो. कुठे काही झालंच नाही काही आजूबाजूला होतंच नाहीय असं वागतोय. करोना रक्षासाची खरंच भीती वाटतं नाहीय का ??? स्वतःसाठी नाही पण घरच्यांसाठी विचार करा. मला माहित आहे प्रत्येक जण समस्यांनी ग्रासला आहे. आज ना उद्या मरायचं आहे पण ते असं का मरावं. संकट समोर असताना हार मानून मरणाला का कवेत घ्यावं. त्या पेक्षा स्वतःच रक्षण करून कुटुंबियांसाठी जगा. देशासाठी जगासाठी जगलंच पाहिजे पण मी तेवढी अपेक्षा नाही करत किमान आपल्या मागे असणाऱ्या मायाळू आई वडिलांसाठी प्रेमळ  बायको मुलांसाठी लाडक्या बहिणी भावासाठी निष्ठावान नवऱ्यासाठी जीवाला जीव द्यायला तयार होणाऱ्या मित्रांसाठी जगा... तुम्ही गेल्यावर त्यांचं मागे काय होईल याचा विचार करा.  त्यांना तुमचं अंत दर्शन तरी भेटेल कि नाही ??



आज आपण दुसरं कोणी आपल्याला सांगताय, त्याच्या धाकाने किंवा भीती पोटी स्वतः वर काही निर्बंध घालून घेतो. पण खरंतर सरकार किंवा पोलीस यांनी सांगावं मग आपण ऐकावं इतके आपण..... स्वतः आपल्याला काहीच वाटतं नाही का??? रात्री 8 नंतर दुकानं बंद सांगून पोलिसांना फेरी मारून बंद करा म्हणून सांगावं लागतं. लग्न, जत्रा इत्यादी ठिकाणी का इतके लोक जमा होतात?? सांगून पण समजत नाही का ? तर अशा लोकांसाठी काय करावं ? ते तरी comments करून सांगा. मग हे सुधारतील. या अशा लोकांनमुळे उद्या लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर त्या गरीब जनतेचे हाल होतील. त्याच वाईट वाटतं. ज्यांना ह्या कोरोना व्हायरस ची भीती वाटतं नाहीय स्वतःला शूर समजत आहेत त्यांना हॉस्पिटल मध्ये तडपडून मरणारे रुग्ण दाखवा त्यांच्या कडून त्या रुग्णांची सेवा करून घ्या....


आज अनेक लोक ट्रेन ने प्रवास करतांना दिसतात. खरंच त्यांना प्रवास करणं गरजेज आहे. एवढे प्रवास करणारे आहेत तरी कोण नेमके? सरकारी कामगार ज्यांना खरंच गरज आहे असे काही जण आपल्या देश सेवेसाठी आपल्या सेवेसाठी सहकार्य करणारे सफाई कामगार, डॉक्टर, पोलीस इत्यादी सरकारी कामगार. पण यांच्या सोबत अनेक खाजगी कंपन्या कामगारांच्या जीवाचा विचार नकरता स्वतःच्या आर्थिक विकासासाठी कामगारांना ऑफिस मध्ये बोलावत आहेत. कृपा करून त्यांनी शक्य तेवढं घरी काम द्यावं. एखादा प्रोजेक्ट किंवा एखाद deal हातून गेलं तर पुन्हा मिळवता येईल. पण एखादा कामगार मेला तर कंपन्याना नवीन कामगार मिळेल पण त्याच्या आई वडिलांना त्यांचा मुलगा मिळणार नाही. कामगार जगले तर पुन्हा भरारी घेता येईल. पण आताच ती भरारी घेण्याच्या नादात त्या कामगारांना नोकरीची गरज आहे म्हणून त्यांच्या जीवाशी खेळू नका. ह्या कंपन्या फक्त त्या कामगारांच्याच नव्हे तर कामगारांच्या घरच्यांच्या जीवाशी देखील खेळत आहेत. जे मालक कामगारांना कामावर ऑफिस मध्ये बोलावतात ते स्वतः ऑफिस मध्ये येतात का ???  नाही. तर ते घरातून व्हिडीओ कॉन्फेरंस द्वारे लक्ष ठेवणार. स्वतः सुरक्षित. स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी कामगारांना संकटात टाकून स्वतः मात्र घरात बसून आहेत. त्यांना माझी हात जोडून विनंती आहे त्या कामगारांना नोकरीची गरज आहे म्हणून त्यांज्याशी अमानुष पणे वागू नका. तुमच्या घरी कुटुंबीय आहेत तसेच त्यांच्या पण घरी त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांचा पण विचार करा. आणि शक्य तेवढं घरी काम द्या.


हा आणि अजून काही लोक ते समुद्र किनारी फिरायला जाताना दिसतात. का जातात ??? का त्या ट्रेन ला गर्दी करता ??? गप्प घरी बसता येत नाही का??? नसेल बसता येत घरी तर नाले सफाई करा काही दिवसात पाऊस पडेल तेव्हा पाणी तुंबून त्रास होणार नाही. रोगराई पसरणार तरी नाही. 



 आता तर बेड मिळणं कठीण झालं आहे. शेवटी एवढंच सांगतो. ही अशीच परिस्थिती राहिली, बिनधास्त कामाशिवाय बाहेर फिरत राहिलो. तर आपल्या प्रेताचा अंत तरी कोण करण्यासाठी शिल्लक असेल कि नाही माहित नाही. कोण कुठे मरून पडलेलं असेल माहित नाही. घरच्यांना तरी शेवटचं दर्शन होईल कि नाही सांगू शकत नाही. कि किडे मुग्यां आपल्या शरीरावर जमा होऊन आपली त्वचा....


माणसा आता तरी जागा हो! 🙏


✍️ विलास अशोक जाधव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks