text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

तुमच्या PF खात्यामधील रक्कम जाणून घेण्यासाठी ‘या’ नंबरवर मिस्डकॉल द्या

 तुमच्या PF खात्यामधील रक्कम जाणून घेण्यासाठी ‘या’ नंबरवर मिस्डकॉल द्या 

 प्रत्येक महिन्याकाठी आपल्या पगारातील ठराविक रक्कम ही भविष्य निर्वाह निधीत (PF Account) जमा होत असते. दर महिन्याला किती रक्कम कापली जाते हे आपल्याला माहिती असले तरी काही काळानंतर पीएफ खात्यात नेमके किती पैसे जमा झाले आहेत, याचा हिशेब ठेवणे शक्य नसते. त्यामुळे आपल्या खात्यात किती रक्कम आहे, याचा नेमका आकडा आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतो. 


 

मात्र, त्यासाठी कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (EPFO) एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तुम्हाला EPFOकडे नोंदणी असलेल्या तुमच्या मोबाईलवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा लागेल. त्यानंतर EPFO कडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याचा क्रमांक, नाव, जन्मतारीख, ईपीएफ बॅलन्स आणि एकूण जमा रक्कम असा सगळा तपशील असेल.

 

SMS पाठवूनही चेक करु शकता बॅलन्स

तुम्ही मोबाईलवरुन SMS पाठवूनही पीएफ खात्यामधील रक्कम जाणून घेऊ शकता. त्यासाठी EPFOHO UAN ENG असे लिहून तो मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवावा. यापैकी ENG म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषेत ही माहिती दिली जाईल. तुम्ही मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही ही माहिती मागवू शकता. मराठीसाठी EPFOHO UAN च्या पुढे MAR असे लिहावे.

 

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks