text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2021


Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2021:- राज्यात कोरोना (कोविड-19) जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने एकल (विधवा) झालेल्या महिलांना ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांमार्फत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देऊन त्यांना सन्मानजनक उपजीविका उपलब्ध होण्यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविणेबाबत.Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2021

 

ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारीत स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना (कोविड-१९) विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात राज्यात ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबामधील कर्त्या पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा कुटुंबांतील महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी या उद्देशाने त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. वीरभद्रकाली ताराराणी Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2021 यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सिध्द करत स्वत:चे शौर्य सिध्द केले होते. अशा वीरभद्रकाली ताराराणी यांचे नावाने राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे. त्या कुटुंबांमधील एकल (विधवा) महिलांसाठी उत्पन्नांची साधने निर्माण करून त्यांना सन्मानजनक उपजीविकेचे साधन व रोजगार शासन निर्णय क्रमांक उमेद-२०२१/प्र.क्र. १५५/ योजना-३ उपलब्ध व्हावा यासाठी "वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती...

 

अ) कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल (विधवा) झालेल्या माहिलांसाठी आर्थिक समावेशन विषयक उपक्रम राबविणे.

आ) कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल (विधवा) झालेल्या माहिलांना जोखीम प्रवणता निधी (Vulnerability Reduction Fund) प्राधान्याने वितरीत करणे.

इ) रोजगार व स्वरोजगारांच्या संधी एकल (विधवा) महिलांना प्राधान्याने उपलब्ध करुन देणे.
१. दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY)
२. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI)
३. उन्नती योजना Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2021

ई) अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एकल (विधवा) महिलांना प्राधान्य देणे 

अधिकृत सरकारी नियम (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks