text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ | NMMS Scholarship Exam 2022


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
 NMMS Scholarship Exam 2022

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विध्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विध्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल. NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022
NMMS Scholarship Exam 2022


🔰 योजनेचे उद्दिष्ट :- 

आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.


 🔰 अर्ज करण्याची पध्दत :- दिनांक १९/०१/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.


🔰 पात्रता :-

🔹विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC/ ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

🔹 पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे.

🔹महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेला असावा.


🔰 खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

👉विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,

👉केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

👉जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,

👉 शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी,

👉 सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


🔰 शिष्यवृत्ती दर:-

📌 शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/ (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते. NMMS Scholarship Exam 2022

📌 शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)

📌 इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)


परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे विषय,शुल्क, माध्यम इत्यादी साठी अधिकृत नोटीस पहा. 🙏


अधिकृत नोटीस पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लीक करा.

अधिकृत नोटीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks