text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BMC बृहन्मुंबई महानगर पालिकेत नवीन भरती

 लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई- 22. येथे 135 अधिपरिचारीकांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने करारनामा सापेक्ष नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला, रुम नं 15, शीव, मुंबई- 400 022 येथे शुल्क रुपये 345/- रोखीत घेवून करण्यात येईल. परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकीत छायांकीत प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि.म.स. रुग्णालय, येथे दि 23.03.2023 ते दि 31.03.2023 पर्यंत स्विकारले जातील. दि 31.03.2023 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही.

  • शैक्षणिक अर्हता :- 

  1. उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी. 

  2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे. 

BSF सीमा सुरक्षा दलात १४११ जागांसाठी भरती | अंतिम तारीख 27 मार्च 2023

  • वयोमर्यादा :- 

  1. उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षा पेक्षा अधिक व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षा पेक्षा अधिक असता कामा नये. 

  2. अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा.

  • सर्वसाधारण अटी :- 

  1. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात. 

  2. उमेदवाराने अर्जावर स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे. 

  3. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अध: पतन किंवा फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवाराविरुद्ध पोलिस चौकशी / न्यायालयिन प्रकरण प्रलंबित असल्यास / शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. 

  4. निवडप्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती/प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्दबातल करण्यांत येईल. तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यांत येईल..

  5. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवडप्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना आहेत. 

  6. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. 

  7. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये 100/- किंवा विधी आकाराप्रमाणे (वेतन मिळकतीनुसार) बॉन्ड पेपरवर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबंधित उमेदवारास करावा लागेल. 

  8. सदर कंत्राटी तत्त्वावरील पदधारकांची नियुक्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आहेत. 

  9. सदर कंत्राटी तत्त्वावरील पदधारकाच्या नियुक्ती कालावधीमध्ये उमेदवाराने शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यांत येईल. 

  10. कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने 8 दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. 

  11. नियुक्ती झालेल्या उमेदवारास म.न.पा. मध्ये कायमस्वरुपी सेवेसाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही तसेच त्यांना नियमित सेवेचे कोणतेही फायदे अनुज्ञेय असणार नाहीत. 

  12. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई- 22. येथे रुग्णालयात कोणत्याही विभागात तीन पाळीत काम करावे लागेल. 

  13. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक 29 दिवसानंतर एक दिवसाचा सेवाखड देण्यात येईल 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ५३६९ जागांसाठी नवीन भरती | अंतिम तारीख 27 मार्च 2023 

  •  विशेष सूचना : 

  1. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुस-या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यादींचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जाहिरात क्र. लोटिरु / 26714/परि. आस्था दि. 21.11.2022 अन्वये दिनांक 23.011.2022 ते दि. 02.12.2022 अन्वये कंत्राटी तत्वावरील 118 प्रशिक्षित अधिपरीचारीका भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील अशा उमेदवारांना सदर भरतीप्रक्रीयेत अर्ज सादर करावयाचे असतील तर त्यांनी आपल्या मागील अर्जाचा संदर्भ stenodeanl@gmail.com या ई-मेल द्वारे द्यावा त्यांचा तोच अर्ज या जहिरातीसाठी ग्राह्य धरण्यात येईल अशा उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही. 

  2. अर्जाचे विहित मुल्य भरुन त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत. 

  3. टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

  4. मुलाखतीच्या वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे Cancelled Chequr छायांकीत प्रत आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह साक्षांकित छाया उपस्थित राहावे व साक्षांकीत प्रती अर्जासोबत जोडाव्या. 

  5. सर्वदृष्टीने परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेलेच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 

 पुणे महानगर पालिकेत नवीन भरती | अंतिम तारीख 28 मार्च 2023

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रति व अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवुन विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज लो. टि.म.स. रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील. दि 31.03.2023 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही. कंत्राटी भरती प्रक्रियेबाबतचे अंतिम निर्णय व सदरबाबत बदल करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राहतील. तसेच उपरोक्त पदाकरीता नियुक्त होणा-या उमेदवारांना महानगरपलिकेची सेवा नियमावली व इतर कुठल्याही प्रकारचे फायदे लागू होणार नाहीत. भरती प्रक्रियेच्या कोणत्यही टप्प्यावर पदांच्या संखेत बदल करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks