text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

म्हाडा चे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत | method of Mhada online application

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ घरांसाठी व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत.

ते ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज करत असतानाच्या प्रत्येक पायऱ्या खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक / माहिती पुस्तिका / तसेच संपर्क नंबर दिलेले आहेत त्याची मदत घेऊ शकता. 

Mhada online form-2022


ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख :- 24 मे 2022


ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

माहिती पुस्तिका वाचण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा


 अर्ज भरण्याची पध्दत👇 आहे :


 १ म्हाडा लॉटरी संकेत स्थळावरील https://www.lottery.mhada.gov.in येथे अर्जदाराने सर्व प्रथम स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नोंदणी करण्याचा कालावधी दिनांक २६/०४/२०२२ ते २४/०५/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. याची कृपया नोंद घ्यावी. (अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती Help File मध्ये दिलेली आहे.)

२ नाव नोंदणीसाठी अर्जदाराने अर्जामध्ये विहीत केलेली माहिती अर्जदाराने भरणे आवश्यक आहे तसेच * अशी खूण असलेली माहिती भरणे बंधनकारक आहे. अशी बंधनकारक माहिती व ड्रॉप डाऊन मधील माहिती फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध राहील.


अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करणेपुर्वी खालील माहिती सोबत ठेवावी, म्हणजे अर्ज भरणे सुलभ जाईल.

१. नाव

२. उत्पन्न गट

३. आरक्षण प्रवर्ग

४. अर्जदार सध्या राहात असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोड क्रमांक

५ अर्जदाराची जन्मतारीख (पॅनकार्ड प्रमाणे)

६. पॅनकार्ड

७. आधार क्रमांक (UID No.)

८. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशिल अर्जदाराच्या स्वतःच्या बचत खात्याचा तपशिल जसे, बँकेचे नाव, शाखा व पत्ता, खाते क्रमांक, बँकेचा IFSC क्रमांक द्यावा. SBH / SBT / SBM / SMP भारतीय महिला बँक या आणि अशा अन्य बैंका ज्या दुसऱ्या मुख्य बँकेत विलिन झाले आहेत अशा बँकेतील खातेदारांनी योग्य त्या बँकेचा IFSC कोड नंबर देण्याची काळजी घ्यावी. अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशिल देऊन अर्ज करता येणार नाही. अन्यथा अर्ज अवध ठरविण्यात येतील. तसेच चालु खाते, संयुक्तीक खाते एन.आर.आय. खात्याचा तपशिल चालणार नाही.


९. अर्जदाराचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) व ई-मेल आय. डी. देणे बंधनकारक आहे.


१०. अर्जदार तसच त्याची पती / पत्नी यांचे दि. ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या कालावधीतील सरासरी मासिक उत्पन्न.


११. अर्जदाराने अर्जामध्ये त्याचा स्वतःचा PAN क्रमांक देणे बंधनकारक आहे. सदर क्रमांक चुकीचा आढळल्यास अथवा दुसऱ्याचा पॅन कार्ड नंबर दिल्याचे आढळल्यास असे अर्ज चुकीची माहिती दिल्यामुळे कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येतील. पॅन क्रमांकाच ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले जाईल.


१२. अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले ५० kb पर्यंत jpg format मध्ये असलेले ठळक व सुस्पष्ट असलेले छायाचित्र तयार ठेवावे. (ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी स्वतःचा फोटो अपलोड करावा.)


४ ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला त्या अकाऊंटद्वारे वेगवेगळ्या संकेतात अथवा एकाच संकतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एका पेक्षा जास्त अर्ज भरता येतील. नोंदणी दि. २६/०४/२०२२ रोजी सुरू होऊन दि. २४/०५/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

Mhada online form-2022


५ अर्जदाराने एकदा नोंदणी केल्यानंतर User Name व पासवर्ड चा वापर करुन सदर अकाऊंट operate करता येईल. सर्व communication हे e-mail व SMS द्वारे करण्यात येणार असल्यामुळे email ID व Mobile Number भरताना काळजी घेणे आवश्यक आहे.


६ ऑनलाईन अर्ज करणे: ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. २५/०५/२०२२ रोजी रात्री ९९.५९ वाजेपर्यंत राहील. अर्ज करताना आपण ज्या उत्पन्न गटाकरिता / प्रवर्गाकरिता पात्र असाल त्या उत्पन्न गटाकरिता असलेल्या संकेतांकाकरिता व प्रवर्गाकरिता अर्ज करावा. (अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती Help File मध्ये दिलेली आहे. त्यानंतर अर्जदाराने प्रिंटेड रिसिट मधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी. प्रिंटेड रिसिट वर अर्ज क्रमांकाबरोबर दहा अंकी क्रमांक दर्शविला जाईल. हाच क्रमांक सोडतीसाठी विचारात घेतला जाणार आहे.


७ त्यानंतर अनामत रक्कमेच्या अदायगीसाठी Payment विवरणामध्ये योग्य पर्यावाची निवड करुन अनामत रक्कम बाबतची प्रक्रिया पुर्ण करावी. (अनामत रक्कमेचे payment करण्यासाठीचे पध्दतीची सविस्तर माहिती Help File यासोबत परिशिष्ठ १ मध्ये दिलेली आहे.) ऑनलाईन पेमेंट स्विकृती दि.२६/०५/२०२२ रात्री ११.५९ पर्यंत राहील. RTGS / NEFT द्वारे करावयाची असल्यास दि. २७/०५/२०२२ पर्यंत अर्जदाराच्या स्वतःच्या संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार जमा करता येईल.


८ जे अर्जदार ऑनलाईन पेमेंट करणार आहेत त्या अर्जदारांनी अर्जाची प्रिंट घेतल्यानंतर किंवा जतन केल्यानंतर अर्जदाराने MY APPLICATION मध्ये जाऊन पेमेंट करावे.


९ अर्जदारास त्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये अनामत रक्कमेचा भरणा करण्यापूर्वी अर्जदाखल करावयाच्या अंतिम तारखेच्या वेळेपुर्वी बदल करता येईल. अनामत रक्कमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल.


१० ↑ अर्जदारास सोडतीपुर्वी अनामत रक्कम भरुन बँकेकडे सादर केलेला अर्ज कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही व सोडतीपूर्वी अनामत रक्कम परत मिळणार नाही. अर्जदाराने Credit Card द्वारे अनामत रक्कम भरल्यावर सदर अनामत रक्कम म्हाडाच्या खात्यावर जमा झाल्याची खात्री करणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. बँके मार्फेत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या चार्जबँक पध्दतीने अर्जदाराने रक्कम परत मिळणेसाठी अर्ज केल्यास किंवा सोडतीपुर्वी रक्कम परत घेतल्यास सदर अर्जदाराचा अर्ज सोडतीसाठी किंवा सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या अर्जदाराचा सदरील सदनिकेवर कसल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही.


११ अर्जदार त्याच्या उत्पन्न गटानुसार पात्र असलेल्या योजना संकेतासाठी अर्ज करु शकेल. तथापि एकापेक्षा जास्त पात्र योजना संकेतासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक संकेत क्रमांकासाठी स्वतंत्र अनामत रक्कमेसह वेगळा अर्ज भरावा लागेल. जर अर्जदार एकापेक्षा जास्त योजना संकेत क्रमांकामध्ये सोडतीत यशस्वी झाला, तरी त्याला त्याच्या पंसतीच्या कुठल्याही एकाच योजना संकतासाठी कागदपत्रे व प्रशासकीय शुल्क जमा करता येईल.

Mhada online form-2022

१२ अर्जदार योजना संकेतामधील ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे अशा सर्व पात्र आरक्षण प्रवर्गातील सदनिकांकरिता अर्ज करु शकतो. प्रत्येक योजनेतील व पात्र प्रवर्गातील सदनिकेकरिता स्वतंत्र अर्ज करावे लागतील व प्रत्येक अर्जासोबत स्वतंत्र अनामत रक्कम व अर्जाची फी भरावी लागेल. मात्र एका योजना संकेतामधील एका प्रवर्गात एकापेक्षा अधिक अर्ज करता येणार नाहीत. तसेच एका पेक्षा जास्त उत्पन्न गटामध्ये अर्ज करता येणार नाहीत. एकाच संकेतामध्ये व एकाच प्रवर्गात अधिक अर्ज केल्याचे आढळल्यास त्या अर्जदाराचे त्या प्रवर्गातील असे सर्व अर्ज कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येतील. वरील अटी व्यतिरिक्त सदर योजनेतील सदनिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळयांची विक्री हस्तांतरण व सदनिकांची अदलाबदल) विनियम १९८१ च्या अटी व शर्ती जशाच्या तशा व संपूर्णपणे (वेळोवेळी होणाऱ्या सुधारणासह) लागू राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks