महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याची संधी_CMF
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम
सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली. तरुणामधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आणि तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळाली.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 2 मार्च 2023
“मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम संपुष्टात आणण्यात आला. परंतु "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची तसेच फेलोना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती...
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा विषयी विविध प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
"मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पायऱ्या / मार्गदर्शक पुस्तिका खालील बटन वर क्लिक करून डाउनलोड करा
"मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" करिता फेलच्या निवडी संदर्भातील निकष, फेलच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
(अ) फेलोंच्या निवडी संबंधातील निकष :-
(१) अर्जदार भारताचा नागरिक असावा.
(२) शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.
(३) अनुभव:- किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटिसशिप / आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
(४) भाषा व संगणक ज्ञान :- मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
(५) वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.
(६) अर्ज करावयाची पद्धत :- ऑनलाईन
(७) अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क : रुपये ५००/-
(८) फेलोंची संख्या - सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.
(९) फेलोंचा दर्जा :- शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
(१०) नियुक्ती संदर्भातील कार्यवाही : फेलोंच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे, नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबविण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबसाईट / वेबपेज तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिध्दी या कामांसाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इ. बाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
(११) निवडीची कार्यपद्धती :-
(i) फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
(ii) परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी. लागेल.
(iii) ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील.
(iv) देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तथापि, प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेता उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा निर्णय अंतिम राहील.
(v) यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.
(vi) वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना विशिष्ट कालावधी दिलेल्या विषयांवरील निबंध ऑनलाईन सादर करावे लागतील.
(vii) वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवा घेण्यात येईल. 3/7
(viii) या २५० उमेदवारांच्या मुलाखतींसाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी :-
(१२) फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी :- फेलोंची नियुक्ती १२ महिने
(१३) विद्यावेतन (छात्रवृत्ती) :-
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल. निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
टप्पा १
भाग १ : ऑनलाईन परीक्षा
भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा २ साठी २१० उमेदवार शॉर्टलीस्ट करणे
टप्पा २
भाग १ : शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग २ : मुलाखत (शॉर्टलीस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू)
भाग ३ : अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे
ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप :
बहुविविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न
माध्यम
परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे व्यवहार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत भाषांतर पुरविले जाईल
एकूण गुण : १००. प्रत्येक प्रश्नास १ गुण
कालावधी : ६० मिनिटे
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks