राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची भरती State-Chief-Information-Commissioner
महाराष्ट्र शासन माहिती आयोग कार्यालयात "राज्य मुख्य माहिती आयुक्त" पदभरण्यात येईल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे पद दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी रिक्त होणार आहे . सदर पदावर राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती होईल . त्या पदासाठी पात्र उमेदवारानी ऑफलाइन अर्ज करावयाचा आहे .
अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य मुख्य माहिती आयुक्तः-
(i) कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन आणि शासन या विषयांचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतील.
RTE प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिक वर
IDBI बँकेत होणार 600 जागांची भरती
(ii) संसदेचा सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या विधानमंडळाचा सदस्य असणार नाही किंवा इतर कोणतेही लाभपद धारण करणार नाही, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाही किंवा कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाही.
आपल्या Whatsapp Group ला जॉइन करण्यासाठी |
वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती नियुक्तीस पात्र ठरणार नाही.
राज्य मुख्य माहिती आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणा-या इच्छुक व्यक्तींनी त्यांचा तपशील मराठी व इंग्रजीमध्ये सोबत जोडलेल्या विहित प्रपत्र व जोडपत्रासह, लिफाफ्यावर "राज्य मुख्य माहिती आयुक्त पदासाठी अर्ज" असे लिहून पोस्टाने, अवर सचिव (कार्यासन- ६), सामान्य प्रशासन विभाग, १९वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२ आणि sic- application@gov.in या ई मेल पत्त्यावर ई मेलद्वारे दिनांक २५ मार्च, २०२३ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठवावेत.
अर्ज |
अधिकृत जाहिरात |
अधिकृत वेबसाईट |
कोणताही अर्ज करताना अधिकृत जाहिरात काळजी पूर्वक वाचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks